सर्व सामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार ! म्हाडासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु; जाणुन घ्या…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत स्वतःचे घर असावे, असे मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण होण्याची आशा म्हाडाच्या घरातून पूर्ण होते. मुंबईत घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण व्हायचे असेल, तर सामान्यांना म्हाडाच्या लॉटरीवरच अवलंबून राहावे लागते. आणि त्यांच्यासाठी हि लॉटरी आता खुली झाली आहे. म्हाडाने घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. दि. २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार असून सोडत दि. १४ ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार असल्याचे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून सांगितले आहे.

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “सर्व सामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोंकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास (म्हाडा)मंडळातर्फे दिनांक २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. याची सोडत दिनांक १४ ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार आहे. आपल्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माहिती देत आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ऑनलाईन सोडतीविषयीही माहिती दिली आहे. त्यामुळे घरे घेण्यासाठी उद्या, दि. २४ ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. आव्हाड यांच्या माहितींनंतर घरे घेणाऱयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे.

mhada konkan mandal house

Leave a Comment