हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणप्रश्नी कोल्हापूरचे भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी सर्व खासदार व आमदारांना आरक्षणाबाबत आवाज उठवावा, असे आवाहन केले आहे. यानंतर आरक्षणप्रश्नी कोल्हापुरातून मोठ्या प्रमाणात पुन्हा लढा उभारण्याचे नियोजन सध्या ते करीत असून आज त्यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक आयोजित केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मराठा आरक्षणप्रश्नी आपण २७ मे रोजीपर्यंत वाट पाहणार असल्याचा इशारा भाजपचे खासदार संभाजी छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. यानंतर त्यांनी मराठा समाज बांधवाना एकत्रित करीत आता मोठा एल्गार देण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाणेच त्यांनी आज कोल्हापुरात महत्वाची बैठकी घेतली आहे. कोल्हापुरात होत असलेल्या या बैठकीत कायदेतज्ञ आणि तालीम संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले आहेत.
मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी संभाजीराजे छत्रपती यांनी आतापर्यंत चारवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी याना पत्र लिहल्याचे त्यांनी सांगितले आहे. आजही हा लढा मराठा आरक्षणप्रश्नी असून मी पक्षपात मानत नाही. माझी भूमिका हि चोख आहे. कोणत्याही परिस्थितीत आता माघार घेणार नसल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले आहे.