Thursday, February 2, 2023

SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, उद्यापासून 3 दिवस पैशांचे ट्रान्सझॅक्शन करता येणार नाही; असे का ते जाणून घ्या

- Advertisement -

नवी दिल्ली । SBI मध्ये खाते असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. जर तुमचे देखील SBI मध्ये खाते असेल तर बँकेने तुमच्यासाठी एक अलर्ट जारी केला आहे. बँकेने सांगितले की,”उद्यापासून तीन दिवस बँकेची स्पेशल सर्व्हिस काही तास काम करणार नाही. बँकेने ट्विट करून ग्राहकांना याबाबतची माहिती दिली आहे.”

खरं तर, SBI ने ट्विटरवर म्हटले आहे की,”सिस्टीमच्या मेन्टनन्समुळे बँकेच्या काही सर्व्हिस 09, 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी बंद राहतील. या सर्व्हिसेसमध्ये इंटरनेट बँकिंग, योनो, योनो लाइट आणि UPI सर्व्हिस समाविष्ट असतील. बँक आपल्या ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी वेळोवेळी अपग्रेड करत राहते, जेणेकरून ग्राहकांना डिजिटल सुविधा सहजपणे मिळतील.

- Advertisement -

https://twitter.com/TheOfficialSBI/status/1446078719622217735?

यावेळी ग्राहक ट्रान्सझॅक्शन करू शकणार नाहीत
SBI ने एका ट्विटद्वारे सांगितले की,”या सर्व्हिस 09 ऑक्टोबरच्या रात्री 12:20 ते 02:20 पर्यंत बंद राहतील. 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी रात्री 11:20 ते 1:20 पर्यंत या सर्व्हिस उपलब्ध होणार नाहीत.”

SBI ने दिलेल्या माहितीनुसार, बँक आपले UPI प्लॅटफॉर्म अपग्रेड करेल म्हणून, जेणेकरून ग्राहकांचा अनुभव सुधारता येईल. या दरम्यान, UPI ट्रान्सझॅक्शन ग्राहकांसाठी बंद केले जातील.”

यापूर्वीही ही सर्व्हिस बंद होती
SBI पहिल्यांदाच कोणतीही सर्व्हिस बंद करते आहे असे नाही. यापूर्वीही बँकेने या सर्व्हिसेस अनेक वेळा बंद केल्या होत्या.

3.45 कोटी लोकं वापरत आहेत
सध्या, SBI योनोचे 3.45 कोटी रजिस्टर्ड युझर्स आहेत आणि दररोज सुमारे 90 लाख लॉगिन केले जातात. डिसेंबर 2020 च्या तिमाहीत SBI ने योनोच्या माध्यमातून 15 लाखांहून अधिक खाती उघडली आहेत.