महत्वाची बातमी ! खऱ्या आणि बनावट रेमडीसीवीर मध्ये कसा ओळखाल फरक ? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था : कोरोनाने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. रूग्णालयात बेड किंवा ऑक्सिजन मिळत नाहीयेत . कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये अँटीव्हायरल औषध रेमडीसीवीरची मागणीही सतत वाढत आहे. बर्‍याच राज्यांत, हे इंजेक्शन मिळवणे सोपे नाही. या औषधाचा काळा बाजार होत असल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. हे औषध मिळण्यासाठी लोकांना 20 ते 40 हजार रुपये द्यावे लागत आहेत. एव्हढेच नाही तर भेसळ असलेले डुप्लिकेट रेमडीसीवीर देखील बाजारात असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशात खरे रेमडीसीवीर आणि खोटे रेमडीसीवीर यातील फरक कसा ओळखायचा ते पाहूया.

रेमडीसीवीरच्या पॅकेटच्या वरील काही चुका वाचून, खरे आणि बनावट यांच्यात फरक होऊ शकतो. 100 मिलीग्राम इंजेक्शन फक्त पावडरच्या स्वरूपात कुपीमध्ये असते .इंजेक्शनच्या सर्व कुपीवर Rxremdesivir लिहिलेले असते.इतकेच नव्हे तर इंजेक्शनच्या बॉक्सच्या मागे एक बार कोडही बनविलेला असतो.दिल्ली पोलिस गुन्हे शाखेच्या डीसीपी मोनिका भारद्वाज यांनी एका ट्वीटद्वारे खर्‍या आणि बनावट रेमेडिसवीरची माहिती दिली आहे.

त्यांनी आपल्या ट्विट मध्ये सांगितले आहे की , रेमडीसीवीर च्या पाकिटावर इंग्रजी अक्षरात For use inअसा मजकूर लिहलेला असतो तर बनावट रेमडीसीवीर औषधाच्या बॉक्स वर for use in अशा पद्धतीचा मजकूर लिहलेला असतो. म्हणजेच बनावट औषधाच्या पाकिटावर मजकुराची सुरुवात लहान इंग्रजी लिपी मध्ये होते. मूळ पॅकेटच्या मागील बाजूस चेतावणी लाल रंगात आहे. तर बनावट पॅकेटवरील चेतावणी काळ्या रंगात दिली आहे.

 

Leave a Comment