हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यापूर्वीच मनसे नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ करीत पक्षातील सर्व पदांचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरे हे नेहमीच हृदयात राहतील. मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे. मी काल उपमुख्यमंत्री अजित पवार याची भेट घेतली. ते एक भेट होती कामासंदर्भात होती, अशी महत्वाची माहिती रुपाली ठोंबरे पाटील यांनी दिली आहे.
मनसे नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी मनसेच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, मी स्वार्थी नसून मला कोठे जायचं आहे म्हणून मी कोणावर टीका करणार नाही. माझ्यात बदल करण्यासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. मी चौदा वर्षे मनसेत काम केले आहे. संघर्ष काय असतो हे मनसेत शिकले आहे. मी माझ्या राजीनाम्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी बोललेली आहे.
शेवटी काम करीत असताना न्याय मिल्ने गरजेचा असतो. मी माझ्या भावना राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवल्या आहेत. चौदा वर्षे जो एखाद्या पक्षातून बाहेर जातो तेव्हा त्याला काय त्रास होतो. हे त्याचे त्यालाच माहीत, असे रुपाली ठोंबरे पाटील यांनी सांगितले.