Imran Khan Jail । पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर येत आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सिफर प्रकरणात इमरान खान यांना आणि त्यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे नेते शाह महमूद कुरेशी यांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. रावळपिंडी येथील विशेष न्यायालयात न्यायाधीश अबुल हसनत जुलकरनैन यांनी अडियाला तुरुंगात ही घोषणा केली. त्यामुळे पाकिस्तानच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच इम्रान खान यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
इम्रान खानला सर्वात मोठा झटका – Imran Khan Jail
गोपनीय राजनैतिक कागदपत्रं उघड केल्याप्रकरणी त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आला होता. मात्र आपल्यावर करण्यात आलेले आरोप राजकीय सूडबुद्धीने करण्यात येत आहेत असा दावा इम्रान खान यांनी केला होता. गेल्या वर्षभरापासून अडियाला कारागृहात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. अखेर आज कोर्टाने इम्रान खान याना दोषी ठरवत १० वर्षाची शिक्षा ठोठावली. महत्वाचे म्हणजे पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. मात्र तत्पूर्वीच त्यांना १० वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा (Imran Khan Jail) ठोठावण्यात आल्याने त्यांच्यासाठी हा सर्वात मोठा झटका मानला जात आहे. मात्र अजूनही त्यांना या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्याचा पर्याय आहे मात्र सध्या त्यांचे आणि पाकिस्तानी लष्कराचे वाद सुरु आहेत ते पाहता त्यांना फारसा दिलासा मिळेल याची शक्यता नाही.
Cypher Case: Former Pak PM Imran Khan, his top aide Qureshi sentenced to 10 years jail
— ANI Digital (@ani_digital) January 30, 2024
Read @ANI Story | https://t.co/ZRPqlcxiQA pic.twitter.com/7joJ8wwS1e
काय आहे प्रकरण –
एप्रिल 2022 मध्ये इम्रान खान यांचे सरकार पडल्यानंतर त्यांनी यामागे अमेरिकेचा हात असल्याचा दावा केला होता. इम्रान यांचा आरोप होता की त्यांना या कटाची माहिती अमेरिकेतील पाकिस्तानचे तत्कालीन राजदूत असद मजीद खान यांनी एका गुप्त पत्राद्वारे दिली होती. 2022 मध्ये अनेक निवडणूक रॅलींमध्ये इम्रान हे पत्र हाताला लावताना दिसले होते. अमेरिकेच्या सांगण्यावरून आपले सरकार लष्कराने पाडले, असा दावा त्यांनी केला होता. कायदेशीरदृष्ट्या, हे पत्र राष्ट्रीय रहस्य आहे, जे सार्वजनिक ठिकाणी दाखवले जाऊ शकत नाही. .त्यामुळे त्यांच्यावर कारवाई (Imran Khan Jail) करण्यात आलीये.
याशिवाय इम्रान खान यांची एक ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झाली . त्यात इम्रान खान, तत्कालीन परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी आणि मुख्य सचिव आझम खान यांचा आवाज होता. फॉरेन्सिक तपासणीत हे सिद्ध झाले की ते ऑडिओ रेकॉर्डिंग खरे होते आणि त्यात इम्रान खान कुरेशी आणि आझमला सांगत होते कि आता आम्ही हे सिफर रॅलीमध्ये दाखवू