इम्रान खान यांना 3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा; लाहोरमध्ये अटकेची कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना तोशाखाना प्रकरणात तीन वर्षांच्या कारावासाची तसेच एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इस्लामाबाद येथील एका जिल्हा व सत्र न्यायालयाने तोशाखाना प्रकरणात इम्रान खान यांच्या विरोधात निकाल दिला आहे. यानंतर लाहोरमध्ये इमरान खान यांना अटक करण्यात आली आहे. कोर्टाने दिलेल्या या निकालामुळे इमरान खान यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. कारण पुढील 5 वर्षे इम्रान खान यांना निवडणूक लढवता येणार नाही.

समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी इम्रान खान यांना लाहोरच्या जमान पार्क येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. इस्लामाबाद पोलिसांनी इम्रान खान विरोधात अटक वॉरंट जारी केले होते. त्यानंतर त्यांच्या अटकेची कारवाई करण्यात आली आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालात इम्रान खान यांना एक लाख रुपये दंड ही भरण्यास सांगितला आहे. यापूर्वी इमरान खान यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तिथे ही त्यांना दिलासा मिळाला नाही.

तोशाखाना प्रकरण काय आहे?

इम्रान खान यांना तोशाखाना प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तोशाखाना हा पाकिस्तान येथील एक सरकारी विभाग आहे. या विभागात सरकारांचे प्रमुख, राष्ट्रपती, पंतप्रधान, खासदार, नोकरशहा आणि अधिकारी यांना मिळालेल्या सर्व परदेशातून मिळालेल्या वस्तू ठेवल्या जातात. इमरान खान पंतप्रधान असताना त्यांच्यावर तोशाखान्यात मौल्यवान भेटवस्तू कमी किमतीत खरेदी केल्याचा आणि त्या विकल्याचा आरोप होता. याचबरोबर, पीटीआयने देखील इम्रान खान यांनी मौल्यवान भेटवस्तू आजूबाजूच्या परिसरात लपवल्याचा आरोप केला होता.

इम्रान खान यांना देखील पंतप्रधान म्हणून युरोप आणि अरब देशातून मौल्यवान भेटवस्तू देण्यात आल्या होत्या. मात्र यातील अनेक भेटवस्तू त्यांनी जाहीर केल्या नाहीत. तर यातील अनेक भेटवस्तू त्यांनी मूळ किमतीपेक्षा खरेदी करून बाहेर त्यापेक्षा जास्त किमतीत विकल्या. ही बाब उघडकीस आल्यानंतर इमरान खान यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले. याप्रकरणी त्यांची सर्वोच्च न्यायालयात देखील याचिका फेटाळण्यात आली. आता इमरान खान यांच्या वरील सर्व आरोप सिद्ध झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.