मुख्यमंत्र्यांबद्दलचा आदर अनेक पटींनी वाढला, इम्तियाज जलील यांच्याकडून कौतुक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता असून महाविकास आघाडी सरकार केव्हाही कोसळु शकते. याच दरम्यान, प्रतिकूल राजकीय परिस्थितीतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट जनतेशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपला संयमी बाणा दाखवत बंडखोरांना भावनिक आवाहन केले. यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे.

जलील यांनी याबाबत ट्विट करत म्हंटल की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खरेपणाचं खरंच कौतुक. आमच्यात राजकीय मतभेद असू शकतात पण आज उद्धव ठाकरेंना ऐकल्यानंतर त्यांच्या बद्दलचा आदर आणखीन वाढला. तुमच्या विनम्रतेने तुमच्या पक्षातील सर्व नाराजांना जोरदार चपराक दिली आहे.

 

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी जनतेशी संवाद साधत भावनिक आवाहन केले. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नको आहे याचं वाईट वाटलं.. मुख्यमंत्री नको असं मला सांगावं मी राजीनामा देण्यास तयार आहे. ज्यांना मी नकोय त्यांनी समोर येऊन सांगावे, मी पद सोडायला तयार आहे. मी आजच वर्षा बंगल्यातून मातोश्रीवर जाण्यास तयार आहे. अस त्यांनी म्हंटल.

Leave a Comment