हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यंदा अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच सततची नापिकी शेतमालाला भाव नसणे डोक्यावर असलेले कर्ज अशा अनेक कारणांमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. मुख्य म्हणजे अशा स्थितीतच जानेवारी 2023 ते 31 ऑक्टोबर 2023 या दहा महिन्यांच्या कालावधीमध्ये राज्यातील 2478 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये अमरावती भागात सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
कोणत्या भागात किती आत्महत्या
अमरावती भागामध्ये दहा महिन्यांच्या कालावधीत 951 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे तसेच छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाडा विभागामध्ये 877 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे नाशिक भागामध्ये 254 शेतकऱ्यांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. त्याचबरोबर नागपूर भागात 257 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे पुणे विभागामध्ये 27 शेतकऱ्यांनी दहा महिन्यांमध्ये आत्महत्या केली आहे. लातूर जिल्ह्यामध्ये 64 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे तर धुळे जिल्ह्यात 28 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे असे मिळून एकूण 24 78 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.
आत्महत्येचे कारण काय?
कर्जबाजारी हवामानातील बदल शेतमालाला भाव नसणे नापिकी अशा अनेक अडचणींमुळे ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना सरकारची कसलीही मदत न मिळत असल्यामुळे आणि योजनांचा देखील योग्य लाभ न झाल्यामुळे देखील शेतकरी त्रस्त झाल्याचे समोर आले आहे.. सध्याच्या स्थितीत पाहिला गेलो तर मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे देखील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय जरी राज्य सरकारने घेतला असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कोणतीही मदत करण्यात आलेली नाही.