देशात २ दिवसात २. ४५ कोटींनी केली नोंदणी , लसींचा मात्र तुटवडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशात लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या १ मे पासून १८ वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण केले जाणार आहे. लसीकरणासाठी २८ एप्रिल पासूनच नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. आरोग्य सेतू , उडाण आणि कोविद पोर्टल द्वारे लसीकरण नोंदणी उपलब्ध करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे कवेत २ दिवसात २. ४५ कोटी लोकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. पण लसींचा मात्र तुटवडा जाणवत आहे.

नोंदणीची आकडेवारी

२८ एप्रिल २०२१- १.३७ कोटी नागरिकांनी नोंदणी केली . त्यानंतर २९ एप्रिल २०२१ रोजी – १.०४ कोटी नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली. ३० एप्रिल २०२१ – सकाळी साडेआठ वाजेपर्यंत 4.38 लाख नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे.

लसींचा तुटवडा

लसीकरणासाठी जे लोक सध्या नोंदणी करत आहेत, त्यांनी लसीकरणासाठीची वेळ मिळत नाहीये. आरोग्य सेतू अॅपनं ट्विटच्या माध्यमातून माहिती दिली आहे, की अठरा वर्षावरील लोकांना लसीकरणासाठीची वेळ तेव्हाच मिळेल जेव्हा राज्यात लसीकरणाला सुरुवात होईल. देशात कोरोनाचा प्रसार झपाट्यानं वाढत आहे, अशात लसीकरण जलद गतीनं होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मात्र, या परिस्थितीत देशात लसीचाही तुटवडा आहे. याच कारणामुले महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगड यासारख्या काही राज्यांनी आधीच स्पष्ट केलं आहे, की लसीचा तुटवडा असल्यानं ते १ मेपासून लसीकरणाला सुरुवात करू शकणार नाहीत.

Leave a Comment