हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी परिवहनमंत्री अनिल परब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार याची भेट घेत चर्चा केली.दोघांच्यात चार तास चर्चा झाली. या चर्चेनंतर परिवहनमंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. “शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेत एसटी संप मिटवण्याबाबत कोणत्या उपाययोजना करू शकतो याबाबत चर्चा केली. मात्र, अजूनही कोणता निर्णय झालेला नाही. मात्र, अनेक मुद्दे, पर्याय समोर आले आहेत, असे परिवहनमंत्री परब यांनी म्हंटले.
परिवहनमंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, गेल्या अनेक दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांकडून आंदोलन केले जात आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे राज्याच्या जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुढाकार घेत चर्चेसाठी बोलवले. त्यामध्ये त्यांनी अनेक मुद्दे तसेच पर्याय समोर ठेवले आहेत. समितीसमोर काय बाजू मांडावी याबाबतही पवारांनी चर्चा केली. एसटीचे उत्पन्न वाढविण्याबाबत चर्चेत अनेक विषय निघाले असल्याचे परब यांनी सांगितले.
अनिल परब व शरद पवार यांच्यातील चर्चेतील मुद्दे –
– एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीवर काय तोडगा काढावा.
– विलीनीकरणाच्या मुद्द्यावर सरकारने काय बाजू मांडावी.
– समितीसमोर राज्य सरकारकडून सहा प्रकारे सकारात्मक बाजू मांडावी.
– एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीसंदर्भात प्रश्न.
– इतर राज्यात व आपल्या राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना दिले जाणारे वेतन.