औरंगाबाद | मागील महिन्यात शहरपोलीस दलात बदल्या करण्यात आल्या होत्या. 560 कर्मचाऱ्यांना नवीन पोलीस ठाणे मिळाले होते. त्याचबरोबर आता पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांनंतर पोलीस दलातही पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. शुक्रवारी रात्री उशिरा पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी 13 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत.
वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांची बदली एमायडीसी वाळूज या ठिकाणी झाली. सिटी चौक पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांची बदली सिडको, सिडकोचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांची बदली सिटी चौक,छावणीचे पोलीस निरीक्षक मनोज पगारे यांची बदली मुकुंदवाडी, मुकुंदवाडीचे पोलीस निरीक्षक शरद इंगळे यांची बदली छावणी, हर्सूलचे पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांची बदली वाळूज, बेगमपुरा चे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांची बदली वेदांत नगर,वेदांत नगरचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांची बदली सुरक्षा शाखेत
सायबर शाखेच्या पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांची बदली उस्मानपुरा, उस्मानपुराचे पोलीस निरीक्षक दिलीप तारे यांची बदली अर्ज चौकशी शाखेत, क्रांती चौकचे पोलीस निरीक्षक अमोल देवकर यांची बदली हर्सूल, एमआयडीसी वाळूजचे पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार यांची बदली बेगमपुरा, छावणी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांची बदली पुंडलिक नगर, राज्य गुप्तवार्ता विभागातून हजर झालेले पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी यांची नेमणूक दुय्यम निरीक्षक म्हणून मुकुंदवाडी अशा विविध ठिकाणी बदल्या करण्यात आल्या आहे.