औरंगाबादेत पुन्हा एका महिलेवर धावत्या रिक्षातून उडी मारण्याची वेळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शहराजवळीलच कामगार चौक ते वाळूज रस्त्यावर रात्रीच्या वेळी रिक्षातील महिलेच्या गळ्याला चाकू लावत लुटण्याचा प्रयत्न झाला. अंगावर स्प्रे मारुन बेशुद्ध करण्यात येत असल्याचे लक्षात येताच महिलेने धावत्या रिक्षातून उडी घेतली. या घटनेत महिला जखमी झाली, मात्र त्यानंतर रिक्षाचालक व सहप्रवाशी म्हणून बसलेले चोरटे पसार झाले. ही थरारक घटना कामगार चौक ते वाळूज रस्त्यावर शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता घडली. मागील दोन महिन्यात एखाद्या महिलेने धावत्या रिक्षातून उडी मारण्याची हि तिसरी वेळ आहे.

वाळूज येथील एक महिला गहाण ठेवलेली सोन्याची साखळी सोडवण्यासाठी बजाजनगर येथे आल्या होत्या. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्या वाळूज येथे जाण्यासाठी वाहनाची वाट पहात होत्या, त्याचवेळी एक रिक्षा (क्र. एमएच-20-डीसी-1974) आला. रिक्षामध्ये पूर्वीच तीन मुले बसलेली होती. त्यामुळे सदर महिला रिक्षात बसली नाही, मात्र त्याचेवळी आणखी एक महिला रिक्षात बसल्याने सदर महिला वाळूज येथे जाण्यासाठी रिक्षामध्य बसली होती.

पुढे काही अंतरावर पेट्रोल पंपाजवळ दुसरी महिला उतरुन गेली. त्यानंतर रिक्षात सह प्रवाशी असलेले तीन तरुण व वाळूजला जाणारी ही महिला होती. मात्र काही अंतर जाताच त्यातील एकाने चाकू काढून महिलेच्या गळ्याला लावला, एकाने स्प्रे मारला व नाकाजवळ कपडा लावून तीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सुरु असल्याने महिलेने जीवाचा विचार न करता धावत्या रिक्षातून उडी घेतली. महिलेने उडी घेतल्याने काहीही चोरी झाली नाही, मात्र महिला गंभीर जखमी झाली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी अजय जमधडे (वय 16, श्रद्धा कॉलनी, वाळूज), करण कांबळे (वय 16, रा. अजबनगर, वाळूज) आणि दिपक ढुणे (वय 16, रा. अजबनगर) यांना अटक केली.

 

Leave a Comment