नवी दिल्ली । देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्यानं वाढतच चालली आहे. गेल्या २४ तासांत करोनाग्रस्तांच्या संख्येत सर्वाधिक मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. गेल्या आठवड्यात दिवसाला ८ हजारांनी वाढणारी संख्या आता ९ हजारांच्या पुढे पोहचली आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील २४ तासांत ९ हजार ३०४ नवे रूग्ण आढळून आले आहेत. एका दिवसात वाढलेली ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या २ लाख १६ हजार ९१९ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे एक लाख ४ हजार १०७ जणांनी करोनावर मात केली आहे. तर १ लाख ६ हजार ७३७ जणांवर उपचार सुरू आहेत.
तर दुसरीकडे कोरोनामळे मृत्यू झालेल्यांची संख्याही ६ हजारांच्या पुढे गेली असून मागील २४ तासांत २६० जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ६ हजार ७५ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे.दे शभरात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात सध्या ७४ हजार ८६० कोरोनाबाधित आहेत. यापैकी ३२ हजार ३२९ जणांनी करोनावर मात कली आहेत. तर २५८७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
This is the highest single day spike in the number of #COVID19 cases (9304) & deaths (260) in India. https://t.co/EZBy0XFGNt
— ANI (@ANI) June 4, 2020
महाराष्ट्रापाठोपाठ तामिळनाडू, गुजरात, दिल्ली, राज्यस्थान आणि मध्य प्रदेशमध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. दरम्यान, शहरातून स्थलांतर केलेल्यांमुळे आता कोरोनानं ग्रामीण भागांतही शिरकाव केल्याचं पाहायला मिळत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”