हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वांत मोठ्या इंजिनिअरिंग कंपन्यांपैकी एक असलेल्या लार्सन एंड टुब्रो (L&T) ने एक नवीन इतिहास रचला आहे. L&T च्या इंजिनिअर्सनी उत्तराखंडमधील ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे मार्गावर अवघ्या 26 दिवसांत एक डोंगर फोडून एक किलोमीटरपेक्षा जास्तीचा मोठा बोगदा तयार केला आहे.
या 16,216 कोटी रुपयांचा प्रोजेक्ट अंर्तगत शिवपुरीपासून ते ब्यासीपर्यंतचा एक किलोमीटर लांबीचा हा बोगदा अवघ्या 26 दिवसांत तयार केला गेला आहे. हा एक विक्रमच आहे. यासाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामीने रेल्वे विकास निगम आणि L&T चे कौतुक केले आहे. इथल्या भौगोलिकरीत्या अवघड असलेल्या परिस्थितीमध्ये देखील काम करून L&T ने एक मोठा इतिहासच रचला आहे.
125 किलोमीटर लांबीच्या या प्रोजेक्ट मध्ये देवप्रयाग, टिहरी गढ़वाल आणि कर्णप्रयाग हे रेल्वे लाईन द्वारे जोडण्यात येतील. यातील 100 किलोमीटरची रेल्वे लाईन ही बोगद्यातून जाणारी असेल. आतापर्यंत 35 किलोमीटर पर्यंतचा बोगदा बनवम्यात आलेला असून 17 आणखी बोगदे बनविण्याचे काम सुरु आहे. यातील 11 बोगद्यांची लांबी 6 किलोमीटरपेक्षा जास्त असेल. या बोगद्याच्या आकार 8 मीटर लांबीचा असेल.
केंद्र सरकारकडून उत्तराखंडमध्ये जोरदार विकास कामे सुरु आहेत. या अंतर्गत रेल्वे लाईनचा विस्तार करण्यावर भर दिला जात आहे. याबरोबरच गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ म्हणजेच चारधाम यात्रा देखील रेल्वे लाईन द्वारे जोडण्यावर वेगाने काम सुरु आहे.