नवी दिल्ली । देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून रुग्णांच्या संख्येत अजूनही वाढ होत आहे. मागील २४ तासांमध्ये देशात ५३ हजार ६०१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ८७१ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाबाधितांची २२ लाखांच्या पुढे जाऊन पोहोचली आहे. भारत आता कोरोना मृतांच्या यादीत जगात तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांमध्ये होणारी वाढ भारताला तिसऱ्या स्थानावर घेऊन गेली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २२ लाख ६८ हजार ६७६ इतकी झाली आहे. त्यापैकी ६ लाख ३९ हजार ९२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत १५ लाख ८३ हजार ४९० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ४५ हजार ५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याप्रमाणे आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या महितीनुसार देशात ऍक्टीव्ह कोरोना २८.२१ टक्के आहे. तर या धोकादायक विषाणूच्या विळख्यातून बाहेर येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६९.८० टक्के असून मृत्यू झालेल्यांचे प्रमाण १.९९ टक्के आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”