नवी दिल्ली । भारतात कोरोना संसर्गाचं प्रमाण वाढलं असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. मागील आठवड्यात दरदिवशी ५० हजार असलेला रुग्ण वाढीचा दर आता ६० हजारांवर पोहोचला आहे. मागील २ दिवसांपासून देशात ६० हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात ६१ हजार ५३७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या २४ तासांत ९३३ जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.
देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २० लाख ८८ हजार ६१२ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. देशात आतापर्यंत १४ लाख २७ हजार ६ रुग्णांवर कोरोनावर मात केली आहे. ६ लाख १९ हजार ९८ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. आतापर्यंत ४२ हजार ५१८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी देशात ५ लाख ९८ हजार ७७८ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. ७ ऑगस्टपर्यंत देशात दोन कोटी ३३ लाख ८७ हजार १७१ कोरोना चाचण्या झाल्या आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”