लातूरमध्ये लग्नासाठी आलेल्या तीन मुलांचा नदी पात्रात बुडून मृत्यू

River
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लातूर : हॅलो महाराष्ट्र – लातूरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. यामध्ये लग्नासाठी आलेल्या तीन मुलांचा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला आहे. उदगीर तालुक्यातल्या लाळी-खुर्द येथे आज सकाळी ही दुर्दैवी घटना घडली आहे. एकनाथ तेलंगे, संगमेश्वर तेलंगे, चिमा तेलंगे अशी या मृत मुलांची नावे आहेत. हे तिघेजण तिरु नदीपात्रात पोहण्यासाठी गेली होती. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि उदगीर नगर पालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. यानंतर अग्निशमन दलाने तिघांचे मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर ते शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेमुळे लाळी खुर्द गावामध्ये शोककळा पसरली आहे.

तिन्ही मुले लग्नासाठी आले होते
मृत मुले लातूर जिल्ह्यातल्या लाळी-खुर्द येथे आपल्या आई-वडिलांसोबत लग्नासाठी आली होती. तिरु नदीच्या पात्रात बुडून तिन्ही मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिरु नदीवर एक बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाऱ्याजवळ नदी पात्रात ही तीनही मुले आज सकाळी सातच्या दरम्यान पोहायला गेली होती.मात्र पाण्याचा आणि गाळाचा अंदाज न आल्याने एक एक करत तिघेही बुडाले. यानंतर मुले बुडताना पाहून त्यांच्या नातेवाईकांनी आरडा-ओरड केली. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. उदगीर नगरपालिकेच्या अग्निशमन पथकाने दोन तास प्रयत्न करून तीनही मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले.

काही दिवसांपूर्वी अशीच घटना लातूरमधील उजना परिसरात घडली होती. अहमदपूर तालुक्यातील उजना गावाजवळ साठवण तलावात पडून पाच महिलांचा मृत्यू झाला होता. तलावात लहान मुलगा बुडत असल्याचे पाहून त्याला वाचवण्यासाठी या पाच महिला तलावात उतरल्या होत्या. मात्र दुर्दैवाने पाचही जणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सर्व मयत महिला परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील तुळशीराम तांडा येथील रहिवासी असून त्या उसतोड मजूर होत्या.

हे पण वाचा :

म्हणून तरुण शेतकऱ्याने कांदा सरळ जनावरांपुढे टाकून दिला..

IND vs ENG : इंग्लंड विरुद्धच्या टेस्टसाठी टीम इंडियाची घोषणा ! ‘या’ खेळाडूचे झाले पुनरागमन

ठाकरे सरकारकडून जनतेला दिलासा : पेट्रोल 2 रुपये 8 पैशांनी तर डिझेल 1 रुपये 44 पैशानी स्वस्त

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला थेट संभाजीराजे छत्रपतींना फोन; म्हणाले की…

राज ठाकरे…माफी नाही तर युपीही नाही, आम्ही सापळा रचला नाही; बृजभूषण सिंह यांचा हल्लाबोल