नाशिकमध्ये उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब नाहीच…

0
42
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नाशिक मध्ये दोन दिवसाच्या दौऱ्यावर होते. नाशिकच्या या दौऱ्यात ते आगामी निवडणुकीचे उमेदवार घोषित करतील अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. मात्र पवारांनी उमेदवारांचे नाव घोषित करण्याची जबाबदारी छगन भुजबळ यांच्यावर दिली आहे.

राष्ट्रवादीच्या बैठकीत पवारांनी नाशिक येथील उमेदवार आपण ठरवू असे सांगितले होते, मात्र नाशिकची जबाबदारी छगन भुजबळ यांची आहे,असे सांगून याची जबाबदारी त्यांनी भुजबळांवर असल्याचे सांगितले. तसेच दिंडोरीमध्ये माकपाला सोबत घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला नाही, यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

भुजबळांचे पुतणे आणि माजी खासदार समीर भुजबळ लोकसभा लढवण्याची तयारी करत आहेत. मात्र पवारांनी आपल्या भाषणात समीर यांचा उल्लेखही केला नाही. त्यामुळे पवारांच्या मनात नेमकं काय आहे, हे कळण्यास मार्ग नाही.
इतर महत्वाचे –

चहाची उधाारी थकल्याने सीएचे कार्यालय फोडले; आरोपीकडुन पावणे दोन लाख हस्तगत

मेळघाटातील वाघीणीचा नैसर्गिक मृत्यू

संख्याबळ भाजप सेनेचे, सभापती मात्र या पक्षाचा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here