कराड | गणपती ऊत्सवाच्या पार्शभुमीवर हातभट्टी दारु, ताडी व अवैद्य मद्य चोरटी वाहतुक व विक्री यावर प्रतिबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विशेष माहीम राबविण्यात येत आहे. पाटण तालुक्यातील बनपुरी येथे सापळा लावून दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एका चारचाकीसह 5 लाख 1 हजार 840 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग कराड यांनी दिली.
विभागीय उप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापुर विभाग वाय. एम. पवार यांचे आदेशान्वये व सातारा राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक अनिल चासकर यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कराड विभागाच्या पथकाने बुधवारी आज दि. 15 सप्टेंबर रोजी पाटण तालुक्यातील बनपुरी येथीस हद्दित सापळा लावुन अवैद्य मद्य वाहतुक करणाऱ्या दोघांवर कारवाई केली. मुंबई दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर छाप्यामध्ये एक ह्युंडाई कंपनीची असेंट चारचाकी वाहन व देशी दारुचे 18 बॉक्स (156 लि. देशी दारु) जप्त करण्यात आले असून एकूण रुपये 5 लाख 1 हजार 840 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरकारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उप-निरीक्षक श्री. शिरीष जंगम तसेच जवान श्री. श्री.भिमराव माळी व श्री. विनोद बनसोडे यांनी केली असुन यापुढेही सदर कालावधीमध्ये अशीच कार्यवाही करण्यात येईल असे विभागाचे उप-निरीक्षक श्री.एस.बी.जंगम यांनी सांगितले.