फलटण | दुधेबावी (ता. फलटण) मंगळवारी येथे सुरू असलेल्या एकाच्या तिसऱ्या लग्नातील राडेबाजी गोष्ट जोरदार चर्चेत आलेली आहे. तिसरे लग्न करत असलेल्या नवरदेवाला पहिल्या पत्नीने विरोध केल्याने मंदिरातच दोन गटात तुफान हाणामारी झाली. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दुधेबावी येथे गणेश वामन एकळ यांचे तिसरे लग्न सुरू होते. यावेळी त्यांच्या पहिली पत्नी किर्ती गणेश एकळ लग्नात आलेल्या होत्या. या लग्नाला पहिली पत्नी किर्ती आणि त्यांच्या नातेवाईकांनी विरोध केला. यावर चिडून जाऊन नवरदेव असलेल्या गणेश वामन एकळ याच्यासह विकास वामन एकळ, संगीता विकास एकळ, कांताबाई वामन एकळ, डॉ. एकळ (संपूर्ण नाव माहित नाही) (सर्व रा. दुधेबावी, ता. फलटण), रोहिणी दत्तात्रय गंगाणे (रा. कोल्हापूर) यांच्यासह 10 ते 12 जणांनी किर्ती यांच्या नातेवाईकांना लोखंडी पाईप, दगड व पट्ट्याने मारहण केली. यामध्ये या भांडणात किर्ती यांचा विनयभंग करण्यात आला.
या भांडणाक किर्ती यांच्या पायातील जोडवी, मोबाईल, सोन्याची चैन गहाळ झाली. याबाबतची तक्रार किर्ती एकळ यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली. याला परस्परविरोधी तक्रार बाळू पोपट सोनवलकर यांनी दिली आहे. यामध्ये कुलदैवताच्या मंदिरामध्ये भांडणे करू नका, असे बोलल्याच्या रागातून भानुदास एकनाथ उराडे याने लोखंडी गजाने मारहाण केली असल्याचे म्हटले आहे.