औरंगाबाद – जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी आणि आरोग्य यंत्रणेसाठी कालचा मंगळवार दिलासादायक ठरला. ग्रामीण भागात तब्बल 315 दिवसानंतर दिवसभरात एकाही कोरोना रुग्णाचे निदान झाले नाही. त्याच बरोबर मागील 24 तासात जिल्हाभरात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही, तर शहरातही अवघ्या तीन कोरणा रुग्णांची वाढ झाली आहे.
औरंगाबाद शहरात मार्च 2020 मध्ये पहिल्या कोरोना रुग्णाचे निदान झाले होते. त्यानंतर 26 एप्रिल 2020 रोजी ग्रामीण भागात पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर अधून मधून रुग्ण आढळत राहिले. मात्र, 6 जून 2020 ते 25 जानेवारी 2019 या कालावधीत ग्रामीण भागात रोज कोरणा रुग्णांची भर पडली. मात्र 26 जानेवारी रोजी ग्रामीण भागात एकही रुग्ण आढळला नव्हता. यानंतर तब्बल 10 महिने म्हणजे सहा डिसेंबर पर्यंत रोज कोरोना रुग्णांची वाढ होत. होती दुसऱ्या लाटेत अनेकदा ग्रामीण भागात रोज 900 च्या घरात रुग्ण आढळले होते.
ग्रामीण भागाची स्थिती –
– 26 एप्रिल 2020 ला ग्रामीणमध्ये पहिला रुग्ण
– 6 जून 2020 ते 25 जानेवारी 2021 पर्यंत रोज रुग्ण
– 26 जानेवारी 2021 रोजी एकही कोरोना रुग्ण नाही
– 27 जानेवारी 2021 ते 6 डिसेंबर 2021 पर्यंत रोज रुग्ण निदान
– 7 डिसेंबर रोजी एकही रुग्ण नाही