सांगली | जिल्ह्यात मागील चार दिवस रुग्णसंख्या स्थिरावल्यानंतर शनिवारी पुन्हा रुग्णांत वाढ झाली. चोवीस तासात 1 हजार 601 रुग्ण आढळून आले. त्यामुळे आत्तापर्यंतची कोरोना रुग्णसंख्या लाखाच्या घरात पोहोचली. दिवसभरात तब्बल 49 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय 1573 जणांनी कोरोनावर मात केली. सांगली महानगरपालिका क्षेत्रात नवे 144 रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात 127, कडेगाव 136, खानापूर 168, पलूस 99, तासगाव 110, जत 273, कवठेमहांकाळ 52, मिरज 190, शिराळा 126 आणि वाळवा तालुक्यात 176 रुग्ण आढळले.
गेले काही दिवस रुग्णसंख्या स्थिरावल्यानंतर शनिवारी पुन्हा रुग्ण वाढले. मागील चोवीस तासात जिल्ह्यातील 6 हजार 443 रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली. आरटीपीसीआर चाचण्या 2334 पैकी 742 बाधित तर 4109 अँन्टीजेन चाचणीमध्ये 951 जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही चाचण्यामध्ये मिळून 1601 जण पॉझिटिव्ह आढळले. जिल्ह्यातील उच्चांकी 49 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सांगली शहर 6 आणि मिरज शहर 2, वाळवा व खानापूर तालुक्यातील प्रत्येकी 7, तासगाव व जत तालुक्यातील प्रत्येकी 5, आटपाडी व कडेगाव प्रत्येकी 4, मिरज व शिराळा प्रत्येकी 3 आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. बाधित रुग्णांपैकी केवळ 1573 जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले.
महानगरपालिका क्षेत्रात रुग्णसंख्या काहीसी कमी झाली. नव्याने 144 रुग्ण आढळून आले. त्यामध्ये सांगली शहरात 92 तर मिरज शहरात 52 रुग्ण आढळले. याशिवाय आटपाडी तालुक्यात 127, कडेगाव 136, खानापूर 168, पलूस 99, तासगाव 110, जत 273, कवठेमहांकाळ 52, मिरज 190, शिराळा 126 आणि वाळवा तालुक्यात 176 रुग्ण आढळले. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील 44, सोलापूर 17, कर्नाटक 17, सातारा जिल्ह्यातील 2, पुणे 6, बीड, उत्तरप्रदेश आणि ओरिसा येथील एक रुग्ण आढळला. या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. या सर्वांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचे 99 हजार 306 रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 2 हजार 879 व्यक्तींचा मृत्यू झाला असून 79 हजार 442 जण कोरोनामुक्त रुग्ण आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 16 हजार 985 रुग्ण अॅक्टीव्ह असून त्यापैकी 13 हजार 740 बाधित रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहेत.