सांगली | जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून रुग्णसंख्या स्थिर असून शुक्रवारी नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त वाढले. त्यामुळे आणखी दिलासा मिळाला. चोवीस तासात 1 हजार 292 रुग्ण आढळून आले. तर 1577 जणांनी कोरोनावर मात केली. याशिवाय 43 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सांगली महानगरपालिका क्षेत्रात नवे 169 रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात 82, कडेगाव 77, खानापूर 151, पलूस 65, तासगाव 140, जत 257, कवठेमहांकाळ 89, मिरज 133, शिराळा 28 आणि वाळवा तालुक्यात 101 रुग्ण आढळले.
कोरोना संशयित रुग्णांची मागील चोवीस तासात जिल्ह्यातील 4 हजार 964 रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली. आरटीपीसीआर चाचण्या 1915 पैकी 609 बाधित तर 3049 अँन्टीजेन चाचणीमध्ये 771 जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही चाचण्यामध्ये मिळून 1292 जण पॉझिटिव्ह आढळले. जिल्ह्यातील 43 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सांगली शहर 7 आणि मिरज शहर 6, खानापूर तालुक्यातील 8, पलूस 5, मिरज, जत व वाळवा तालुक्यातील प्रत्येकी 3, आटपाडी, कडेगाव व शिराळा तालुक्यातील प्रत्येकी 2 आणि तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. नव्या रुग्णांपेक्षा 1577 बाधित रुग्णांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली.
महानगरपालिका क्षेत्रात रुग्णसंख्या कमी झाली. नव्याने 169 रुग्ण आढळून आले. सांगली शहरात 112 तर मिरज शहरात 57 रुग्ण आढळले. याशिवाय आटपाडी तालुक्यात 82, कडेगाव 77, खानापूर 151, पलूस 65, तासगाव 140, जत 257, कवठेमहांकाळ 89, मिरज 133, शिराळा 28 आणि वाळवा तालुक्यात 101 रुग्ण आढळले. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील 41, सोलापूर 18, कर्नाटक 14, सातारा जिल्ह्यातील 5, पुणे 9 आणि बिहार येथील एक रुग्ण आढळला. या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. या सर्वांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचे 97 हजार 705 रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 2 हजार 830 व्यक्तींचा मृत्यू झाला असून 77 हजार 869 जण कोरोनामुक्त रुग्ण आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 17 हजार 6 रुग्ण अॅक्टीव्ह असून त्यापैकी 13 हजार 696 बाधित रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहेत.