साताऱ्यात टेम्पो- दुचाकीच्या धडकेत युवक जागीच ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा |  शहरातील गुरुवार बागेजवळ पिकअप टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वारील युवकाचा जागीच मृत्यू झाला.  शुक्रवारी रात्री 9च्या सुमारास झाला हा अपघात झाला. या अपघातात विनायक संपतराव साळुंखे (वय – 35 वर्षे रा. पिलानीवाडी, ता. सातारा) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, विनायक साळुंखे हा दुचाकीवरुन समर्थ मंदिरकडून पोवई नाक्याकडे निघाला होता. तर नाक्यावरून समर्थ मंदिरकडे पिक अप टेम्पो येत होता. याचवेळी गुरुवार बागेजवळील शुभम अॅटो गॅरेज समोर दुचाकी आणि टेम्पोची धडक झाली. वाहनांची झालेली धडक इतकी भीषण होती की विनायक साळुंखे याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्यामुळे डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

या अपघातामध्ये त्याच्या दुचाकीचा अक्षरश: चक्काचूर झाला. विनायक साळुंखे हा फोटोग्राफीचा व्यवसाय करत होता. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेऊन घटनास्थळाची पाहणी करुन पंचनामा केला. पंचनामा झाल्यानंतर टेम्पो चालका विरुध्द गुन्हा दाखल केला.