सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात सोमवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 1 हजार 310 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 1 हजार 416 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 23 हजार झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 38 हजार 734 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 12 हजार 623 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 3323 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर रविवारी दिवसभरात 38 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
लसीकरण बंदमुळे लोकांना मनस्ताप
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी लसीकरण करून घ्यावे असे शासन आवाहन करत आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी लसीकरण बंद आहे. त्यामुळे वयोवृध्द नागरिकांना हेलपाटे मारावे लागत असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व ब्रेकिंग बातम्या मोबाईपवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा???????? http://bit.ly/3t7Alba