सातारा | सातारा जिल्ह्यात गुरूवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये नवे कोरोना 597 पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 797 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 11 हजार 633 चाचण्या तपासण्यात करण्यात आलेल्या आहेत. तर 5.13 इतका पाॅझिटीव्ह रेट आहे.
जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 10 हजार 912 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 2 लाख 33 हजार 536 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 2 लाख 19 हजार 675 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 5 हजार 689 बाधितांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी दिवसभरात 36 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
तालुकानिहाय बुधवारी रात्री आलेली कोरोना बाधितांची संख्या तर बुधवार अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात
जावली 14 (9702), कराड 94 (37158), खंडाळा 30 (13622), खटाव 92 (23409), कोरेगांव 40 (20201), माण 85 (16191), महाबळेश्वर 2 (4555), पाटण 15 (9847), फलटण 168 (33429), सातारा 149 (47953), वाई 49 (15083) व इतर 13 (1789) असे आज अखेर एकूण 232939 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.