शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला नतमस्तक होताना नारायण राणेंनी मागितला “हा” आशिर्वाद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जनतेपर्यंत तुमच्या राज्यात जावून त्याच्या अडीअडचणी समजून घेवून तुम्ही कारभार करा. त्यामुळे मी कालपासून छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला नतमस्तक होवून निघालो. मुंबई शहरात जनआशीर्वाद काढली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला नमस्कार केला. साहेब तुम्ही मला आशीर्वाद द्यायला आज हवे होता असा आशिर्वाद सूक्ष्म, लघू उद्योग केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मागितला असल्याचे सांगितले.

भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नारायण राणे म्हणाले, गेल्या 7 वर्षात नरेंद्र मोदी यांनी जी देशाला प्रगतीकडे नेण्याची जी कामे केली ती सांगण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्याच्या 75 वर्षात भारत कसा असावा. गरीब, महिला, कुपोषित बालक यासाठी योजना केलेल्या आहेत. गुन्हे नोंदवत आहे, त्यांच्या डोक्यावर आम्ही दिल्लीत बसलो आहे.

मुंबईला 32 वर्ष सत्ता एका पक्षाला आहे. मुंबई भ्रष्ट कारभार होत आहे. मी कुणाला नमस्कार करायचा तो माझा प्रश्न आहे. कोणी गोमुत्र शिंपडले ते शिपडू द्या, त्यांना प्यायचं असेल तर पिवू द्या. सध्या बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक दलदलीत आहे. गोमूत्र शिंपडणाऱ्यांनी जागतिक किर्तीचे स्मारक व्हावे, यासाठी प्रयत्न करावेत. गोमुत्राने शुध्दीकरण करण्यापेक्षा स्वतःचे मन शुध्द करावे, असा टोला नारायण राणेंनी लगावला.

 

Leave a Comment