सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंन दिवस वाढताना दिसत आहे. तर बाधित मृत्यूचाही आकडा वाढताना पहायला मिळत आहे. आज आलेल्या रिपोर्टमध्ये 854 जण कोरोनाबाधित आले आहेत. तर चोवीस तासांत जिल्ह्यात 3 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.
जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांचा संख्या 73 हजार 212 आहे. तर जिल्ह्यात एकूण 63,335 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. सध्या जिल्ह्यात 7 हजार 029 उपचारार्थ दाखल रुग्ण आहेत.
कोरोना बाधितांची वाढणारी संख्या जिल्ह्यासाठी चिंताजनक आहे. त्यामुळे विकेंड लाॅडकडाऊन कडक करण्यसाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. चाैका- चाैकात नाकाबंदी करून प्रत्येक वाहन धारकांची कसून चाैकशी केली जात आहे. विना परवाना घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांकडून प्रसादही दिला जात आहे. प्रशासनाकडून निर्बंध कडक करण्यात आले असून नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकार शेखरसिंह यांनी दिली आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा