सातारा प्रतिनिधी | शुभम बोडकेे
सातारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 889 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 789 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 11 हजार 685 चाचण्या तपासण्यात आल्यानंतर त्यामध्ये पाॅझिटीव्ह रेट 7.61 टक्के इतका आहे.
जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 10 हजार 911 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 2 लाख 13 हजार 323 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 99 हजार 594 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 5 हजार 122 बाधितांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी दिवसभरात 12 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
जिल्हय़ाचा पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला असून निर्बंध कधी शिथिल होणार याकडे जिल्हय़ाचे लक्ष लागले आहे. कोरोनाशी लढा सुरू असताना गेले चार दिवस जिल्हय़ात तुफानी पाऊस सुरू असून महापूर, दरडी कोसळण्याच्या घटनांनी जिल्हा बेजार झाला आहे. पाटण तालुक्यात तीन ठिकाणी ‘माळीण’ची पुनरावृत्ती झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.