धक्कादायक ! लग्न होत नसल्याच्या तणावातून नातवाने केली आजीची हत्या

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापुरातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये माझं लवकर लग्न का लावून देत नाही, असं म्हणत नातवाने आजीची हत्या (Murder) केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी नातवाला अटक केली असून पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.

काय आहे नेमके प्रकरण ?
सोलापरूच्या आदर्शन नगर, मित्र नगर शेळगी इथ मालनबी हसनसाहब नदाफ या वृद्ध महिलेनं आपल्या नातवाला लग्नासाठी घरी बोलवलं होतं. या महिलेच्या नातवाचं नाव सलीम नदाफ असं आहे. त्याचं लग्न लावून देण्यासाठी सोलापुरात मुलगी पाहायला आजीनं बोलावून घेतलं होतं.लग्नसाठी काही मुली पाहण्याचे कार्यक्रमही झाले. मात्र लग्न जुळत नसल्यानं नातवाला असह्य झाले. यानंतर प्रचंड तणावात गेलेल्या नातवाने अंगणात बसलेल्या आजीवर हल्ला करून तिची हत्या (Murder) केली आहे.

लग्न जुळत नसल्यानं वाद
आरोपी सलीम हा कर्नाटकातून सोलापुरात मुलगी पाहण्यासाठी आला होता. सोलापुरात त्यांनी काही ठिकाणी लग्नासाठी मुली पाहिल्या. मात्र लग्न जुळत नसल्यानं तो तणावात होता. घटनेच्या दिवशी आजी मालनबी नदाफ या घरासमोरील पटांगणात फरशीवर बसल्या होत्या. त्यावेळी सलीम नदाफ घरी आला आणि आजीला विचारणा करु लागला. आजी तू माझं लग्न का लावून देत नाही? उगा मला कर्नाटकातून इथं का बोलवून घेतेस? असा जाब त्याने विचारला. यानंतर सलीमने बोलणे झाल्यानंतर आजीच्या डोक्यात काठीने हल्ला केला. या हल्ल्यात मालनबी या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरदम्यान, त्यांचा मृत्यू (Murder) झाला. याप्रकरमी फिरोज शकुर नगाफ यांच्या तक्रारीवरून आरोपी सलीम विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :

आईच्या मृत्यूनंतर विरह सहन न झाल्याने 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या

शरद पवार यांना धमकीचे ट्विट

KKR चा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे उर्वरित IPL मधून बाहेर

NIA ची मोठी कारवाई : डी गँगच्या दोघा जणांना अटक

एक दिवस औरंगजेबाच्या भक्तांना त्याच कबरीत जावे लागेल…, संजय राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल