BREAKING NEWS सुशांत सिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी रूममेट सिद्धार्थ पिठानीला NCBने केली अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने १४ जून २०२० रोजी आत्महत्या करीत संपूर्ण जगाचा निरोप घेतला. त्याच्या या एका पाऊलामुळे अनेकांनी त्यांचा मित्र, सखा, बंधू आणि इंडस्ट्रीने एक हरहुन्नरी कलाकार कायमचा गमावला. इतकेच नव्हे तर त्याच्या निधनामूळे त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. त्याच्या निधनाला येत्या पुढील महिन्यात तब्बल एक वर्ष पूर्ण होईल. या दरम्यान आता त्याच्या आत्महत्या प्रकरणात सर्वात मोठी बातमी येत आहे. नुकत्याच हाती आणलेल्या बातमीनुसार NCB ने सुशांतच्या अगदी जवळचा मित्र सिद्धार्थ पैठणी याला अटक केली आहे.

https://twitter.com/ANI/status/1398162096706134017

एनसीबीने सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात त्याचा जवळचा मित्र आणि सहकारी असणाऱ्या सिद्धार्थ पिठानी याला अटक केली आहे. एनसीबीने अटक केलेला सिद्धार्थ पिठानी हा सुशांतच्या अत्यंत नजीकच्या व्यक्तींपैकी एक होता. गेल्यावर्षी सुशांतच्या मृत्यूनंतर सिद्धार्थ पिठानी हे नाव अनेकदा वारंवार समोर येत होते. आता पुन्हा एकदा त्याचं नाव जोरदार चर्चेत उसळत आहे. कारण एनसीबीने सिद्धार्थला अटक केली आहे. सूत्रानुसार, एनसीबीने सिद्धार्थला हैदराबादमधून नुकतीच अटक केली आहे.

https://twitter.com/PradeepBfanclub/status/1398172064033349634

विश्वासू सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या स्वीय सहाय्यक आणि अत्यंत जवळच्या मित्रांपैकी सिद्धार्थ पिठानी हे एक नाव आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर हे नाव अनेक दिवस चर्चेत होते. मात्र अद्याप त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती. त्यानंतर सुशांतच्या मृतिदिनास अगदी काहीच दिवस शिल्लक असताना सिद्धार्थला अटक होणे हि बातमी अत्यंत खळबळजनक आहे.

https://twitter.com/Newsbox_India/status/1398174764821147648

माहितीनुसार, सुशांतला मृत्यूपूर्वी ड्रग्ज देण्यात सिद्धार्थचा हात होता असा संशय वर्तविला जात आहे. दरम्यान अनेक चौकशी आणि सखोल तपासानंतर NCBने सिद्धार्थवर कारवाई केली आहे. तूर्तास कोणतीही अन्य माहिती मिळाली नसल्यामुळे कोणतेही अंदाज वाळविणे अशोभनीय आहे. त्यामुळे अद्याप या अटकेबाबत अन्य कोणतीही माहिती पुरविणे अशक्य आहे.

Leave a Comment