सातारा | जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2001 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 34 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची आजची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 76 (4,239), कराड 244 (14,460), खंडाळा 162 (5,629), खटाव 114 (7,577), कोरेगांव 117 (7,741),माण 177 (5,147), महाबळेश्वर 92 (3,073), पाटण 110 (3,689), फलटण 253 (11,520), सातारा 372 (21,159), वाई 249 (7,014 ) व इतर 439 असे आज अखेर एकूण 91, 687 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (92), कराड 3 (404), खंडाळा 0 (78) ,खटाव 6 (223), कोरेगांव 3 (219), माण 1 (124), महाबळेश्वर 1 (28), पाटण 1 (110), फलटण 3 (163), सातारा 12 (686) व वाई 3 (164) असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 2,291 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरात 1 हजार 12 नागरिकांना घरी सोडले
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 1012 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा