हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महत्वाचा ओबीसी स्नाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न अजूनही राज्य सरकारकडून मार्गी लावण्यात आलेला नाही. या प्रश्न संदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व पक्षीय बैठक घेतली. यावेळी “ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे. हि प्रत्येकाची धारणा आहे. या विषयावर सर्वच पक्षांचे एकमत आहे. यासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीत प्राप्त झालेल्या सूचना, विविध पर्यांयाचा अभ्यास करून येत्या शुक्रवारी यावर सर्वानुमते निर्णयाप्रत येण्यासाठी बैठक घेऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आज सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठक पार पडली. यावेळी सर्वपक्षीय नेते या बैठकीला उपस्थित राहिले होते. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होऊ नयेत, ही सर्वांचीच भावना आहे. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्याबाबत सध्या विचार सुरु आहे.
ओबीसी आरक्षणासाठीची सर्वपक्षीय एकजूट आणि एकमत असेच टिकवून ठेवने आवश्यक आहे. आजच्या बैठकीत प्राप्त झालेल्या सुचना आणि पर्यायांचा येत्या काही दिवसात अभ्यास करून येत्या शुक्रवारी यासंबंधाने सर्व सहमतीने निर्णय घेऊ असे यावेळी मुख्यामंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यन्त निवडणुका रद्द नाही – फडणवीस
राज्य सरकारपुढे ओबीसी समाजाच्या आरक्षणप्रश्नी आता कोणताही पर्याय उरलेला नाही. त्यामुळे जोपर्यंत आरक्षणाचा विषय सोडवला जात नाही. तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा अथवा रद्द करण्याचा निर्णय घेऊ नये, अशी मागणी केली असल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.