मराठा आरक्षण आंदोलनातील ४६० तर भीमा कोरेगाव प्रकरणातील ३४८ गुन्हे मागे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षण आंदोलनातील ४६० गुन्हे तर भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील ३४८ गुन्हे शासनाकडून मागे घेण्यात आलेत अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. तसेच या प्रकरणातील इतरही अनेक गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते विधानपरिषदेत बोलत होते.

मराठा आरक्षण आंदोलन प्रकरणातील ५४८ पैकी ४६० गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. या प्रकरणी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि पोलिसांवरील हल्ल्यांसारख्या गंभीर स्वरुपाचे गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत, असेही देशमुख यांनी सांगितले.

भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी एकूण ६४९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यांपैकी सध्या ३४८ गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. उर्वरित गुन्हे देखील मागे घेण्याचे काम सुरु आहे. असं देशमुख म्हणाले.

Leave a Comment