Saturday, March 25, 2023

अवैध दारूविक्री प्रकरणी चाैघांवर गुन्हा तर 1 लाख 45 हजारांचा मुद्देमाल जप्त

- Advertisement -

सातारा | पुसेगाव आणि सोकासन याठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेकायदा दारु विक्री सुरु असलेल्या ठिकाणी छापे टाकण्यात आले. यावेळी चौघांवर गुन्हा दाखल केला असून 1 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अनिल चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत निरीक्षक भरारी पथकाने छापे टाकले. या छाप्यात नसरुद्दीन अमानुल्ला मुल्ला (रा. पुसेगाव ता. खटाव) तसेच अनिल शिवाजी बोडरे, अविनाश जगन्नाथ भोसले व एक अज्ञात असे (तिघेही रा. सोकासन ता. माण) यांना बेकायदा दारु विक्री प्रकरणी अटक करण्यात आली.

- Advertisement -

या संशयितांकडून ३७ बॉक्स देशी दारु ६ बॉक्स विदेशी दारु, २ वॉक्स बियर असा सुमारे 1 लाख 45 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाईमध्ये निरीक्षक आर. एल. पुजारी, दय्यम निरीक्षक नंद क्षीरसागर, नितीन जाधव, महेश मोहिते, संतोष निकम, अजित रसाळ, जीवन शिर्के, सचिन खाडे, किरण जमग यांनी भाग घेतला.