किरण माने प्रकरणात स्टार प्रवाह चॅनेलच्या अडचणी वाढणार, सरकार देणार चाैकशीचे आदेश?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके

स्टार प्रवाह या मराठी चॅनेलवर सुरू असलेल्या “मुलगी झाली हो” या मालिकेतील प्रमुख भूमिकेत असलेल्या किरण माने यांना तडाफडकी मालिकेतून काढण्यात आले. किरण माने यांनी सोशल मिडियावर केलेल्या पोस्टमुळे त्यांना मालिकेतून काढले असल्याचे म्हटले आहे. यावर आता स्टार प्रवाह चॅनेल अडचणीत येताना दिसत आहे, कारण या प्रकाराबाबत अभिनेता किरण माने यांची तक्रार आल्यास राज्य सरकार चाैकशी करणार असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे.

सातार येथे पत्रकारांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना अभिनेता किरण माने यांच्याविषयी प्रश्न विचारला. मराठी मालिका सृष्टीतील आघाडीचे आणि प्रसिद्ध अभिनेता किरण माने यांना मालिकेमधील काम थांबवायला सांगितल्या नंतर त्याचे पडसाद विविध क्षेत्रातून आता उमटू लागले आहेत. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी या बाबत वहिनीला आणि वहिनीच्या व्यवस्था पणाला जोरदार इशारा दिला आहे. या वेळी बोलत असताना ते म्हणाले, अशी जर घटना घडली असेल तर हा महाराष्ट्रातील मराठी कलाकारांवर झालेला हा अन्याय आहे. आम्ही ते कधीही सहन करणार नाही.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, मराठी मालिका सृष्टीतील आघाडीचे आणि प्रसिद्ध अभिनेते किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट करताना कोणत्याही पक्षाचे, संघटनेचे नाव घेतलेले नाही. त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याचा, लिहण्याचे अधिकार आहे. महाराष्ट्रातील बाहेरील चॅनेल आहे. जर बाहेरील चॅनेलनी अशा प्रकारचा अन्याय केला तर आम्ही सहन करणार नाही. किरण माने यांच्याशी सविस्तर मी बोलणार असून त्यांची तक्रार असल्यास महाराष्ट्र राज्य सरकार योग्य ती चाैकशी करेल. तसेच तक्रारीची चाैकशी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.

Leave a Comment