नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात कोरोना बाधित रुग्णांची नवी आकडेवारी आता समोर आली आहे. या आकडेवारीवरून दिलासादायक बाब कशी दिसते आहे की कोरोनातून तून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता वाढली आहे. देशात मागील 24 तासात 3,44,776 जणांना उपचारातून बरे करून घरी सोडण्यात आले आहे. तर मागील 24 तासात तीन लाख 43 हजार 144 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. या बाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
दरम्यान मागील 24 तासात कोरोनामुळे चार हजार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ही दोन कोटी 40 लाख 46 हजार 809 इतकी झाली आहे. तर एकूण दोन कोटी 69 हजार 599 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर देशात आतापर्यंत कोरोना मुळे दोन लाख 62 हजार 317 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
देशात सध्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 37 लाख 4 हजार 893 इतकी आहे. संपूर्ण देशात लसीकरण मोहिमेला वेग आला असून आतापर्यंत 17 कोटी 92 लाख 98 हजार 584 व्यक्तींना लसीकरण करण्यात आला आहे. याबाबतची आकडेवारी ही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.