दिलासादायक ! देशात मागील 24 तासात 3 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनमुक्त तर 2,22,315 नव्याने बाधित

corona test
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था: मागील काही दिवसांपासून दररोज नव्याने वाढ होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत आता घट होतानाचे चित्र दिसत आहे ही बाब दिलासादायक आहे. तसंच नव्याने बाधित होणाऱ्या संख्येपेक्षा देशात नव्याने कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. मात्र कोरोनामुळे होणारे मृत्यू ही चिंतेची बाब ठरताना दिसत आहे. देशात मागील 24 तासात दोन लाख 22 हजार 315 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर तीन लाख 2544 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच मागील 24 तासात 4454 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

दरम्यान नव्याने वाढलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येमुळे देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही दोन कोटी 67 लाख 52 हजार 447 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत देशात दोन कोटी 37 लाख 28 हजार अकरा रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तसेच आतापर्यंत देशात एकूण तीन लाख तीन हजार सातशे वीस जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. देशात सध्या 27 लाख 20 हजार 716 कोरोना बाधित रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार केले जात आहेत. देशात कोरोनाला हरवण्यासाठी लसीकरणाची मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत संपूर्ण देशामध्ये 19 कोटी 60 लाख 51 हजार 962 व्यक्तींना कोरोना लसीकरण करण्यात आले आहे याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

ICMR ने दिलेली आकडेवारी

आयसीएमआर ने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत 23 मे 20२१ पर्यंत 33 कोटी 5 लाख 36 हजार 64 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. तर 23 मे 20२१ रोजी 19 लाख 28 हजार 127 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत अशी माहिती इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच ICMR ने दिली आहे.