सातारा जिल्ह्यात नवे 2 हजार 376 कोरोना पाॅझिटीव्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात मंगळवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 2 हजार 376 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 1 हजार 832 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 23 हजार 180 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 14 हजार 504 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 88 हजार 452 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 2642 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या काही दिवसांत कोरोमुक्तीचा व बाधितांचा आकडा जवळपास समसमान असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी दिवसभरात 1 हजार 832 रूग्ण बरे होवून घरी गेले, जिल्ह्याला दिलासादायक बातमी आहे. तर मंगळवारी रात्री नव्याने केवळ 2 हजार 376 बांधितांच्यामुळे जिल्ह्यातील सर्वात रेकाॅर्डब्रेक आकडे थांबले नसल्याचे चित्र पहायला मिळाले आहे. तर सोमवारी दिवसभरात 32 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाल आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व ब्रेकिंग बातम्या मोबाईपवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा???????? http://bit.ly/3t7Alba

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment