मुंबई | मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याच्या कबरीचा मुद्दा सध्या राज्याच्या राजकारणात चांगलाच तापला आहे. पोलिस त्याचे काम करत आहेत, जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
याकूब मेमन याची कबर फुलांनी सजवण्यात आल्याचा एक फोटो व्हायरल झाला होता. फोटो व्हायरल झाल्यानंतर भाजपाने शिवसेनेवर टीकेची झोड उठवली. तर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनीही त्यास प्रत्युत्तर दिले आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी तर पेंग्विन सेनेने कबर बचाव कार्यक्रम जाहीर करावा असे म्हणले होते. मात्र, या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, त्यामध्ये कोणावरही थेट आरोप केलेला नाही.
एकनाथ शिंदे म्हणाले, अरे बाबा गणपती दर्शन घेतले, बाकी काहीच नाही. उपमुख्यंत्री यांच्या निवासस्थानी गणपती दर्शनासाठी आलो आहे. दुसरं काही नाही. ते पोलीस त्याचं काम करतायतं. जे काही चुकीचे झाले आहेत, त्यांच्यावर कारवाई होईल.