औरंगाबाद – मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वेने औरंगाबाद हुन केवळ पावणेदोन तासात मुंबईला जाणे शक्य होणार असून, या प्रकल्पाची भूसंपादन प्रक्रिया पर्यावरण आणि सामाजिक परिणामाच्या मूल्यांकनासह डीपीआरसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर रिजनल कमांड सेंटर (प्रादेशिक नियंत्रण केंद्र) सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी स्वतंत्र दालन देण्यात आले असून, अद्याप मात्र अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही.
औरंगाबाद जिल्ह्यात हायस्पीड रेल्वेचा 111 किलोमीटर ट्रॅक निर्माण करण्यात येणार असून, समृद्धी महामार्गालगत समांतर ते रेल्वे ट्रॅक ची बांधणी केली जाणार आहे. नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचा हा प्रकल्प प्रस्तावित असून कमांड कंट्रोल सेंटर सुरू होणार असल्याने लवकरच डीपीआरचे काम हाती घेण्यात येणार आहे. डीपीआर नंतर प्रकल्पाचा एकूण खर्च बांधणीचा कालावधी एकूण रहदारी याबाबी स्पष्ट होतील.
हायस्पीड रेल्वे प्रकल्पात काय आहे –
– एकुण लांबी – 749 किमी
– एकुण स्थानके – 14
– एकुण भुसंपादन – 1245.61 हेक्टर
– 10 जिल्ह्यांना जोडणार
– प्रवासी वाहतूक क्षमता – 750
– 15 बोगदे (25.23 किमी लांबी)
– रेल्वेचा ताशी वेग – 330 ते 350 किमी
– 17.5 मीटर रूंदीचा समृद्धी महामार्गालगत मार्ग