चंद्रकांत पाटलांची नजर कमजोर, त्यांना वैद्यकीय मदतीची गरज – संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री अनुपस्थित राहिल्याने यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पाटील यांना टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटलांची नजर कमजोर झाली आहे. त्यांना दिसत नाही. ऐकायला येत नाही. त्यांना वैद्यकीय मदतीची गरज आहे, असा चिमटाही राऊत यांनी काढला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्री ठाकरेंवर शस्त्रक्रिया झाली असून त्याची तब्बेत बरी नाही. पुढच्या तीन चार दिवसात मुख्यमंत्री विरोधी पक्षांना दिसतील. ते सर्व कामकाजांवर लक्ष ठेवून आहेत. चंद्रकांत पाटलांची नजर कमजोर झाली आहे. त्यांना दिसत नाही. ऐकायला येत नाही. त्यांना मेडिकल हेल्पची गरज आहे. आम्ही त्यांना वैद्यकीय मदत देऊ, असा चिमटाही त्यांनी लगावला.

विधानसभा हिवाळी अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण

 

मुख्यमंत्री अधिवेशनात उपस्थित राहत नाहीत म्हणून विरोधकांकडून त्याच्यावर टीका केली जात आहे. दुसऱ्याला मुख्यमंत्री करा अशी मागणी करीत आहेत. चंद्रकांत पाटील यांनीही काल रश्मी ठाकरे अथवा आदित्य ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा चार्ज सोपवावा, अशी मागणी केली. मुख्यमंत्री विधिमंडळाच्या अधिवेशनात येत नाहीत असे विरोधक म्हणत आहे.

शक्ती कायद्यावर विधानसभेत चर्चा

मीही म्हणतो आम्हालाही पंतप्रधान मोदी संसदेत दिसत नाहीत. ते या ठिकाणी येत नाहीत. आम्हीही पंतप्रधानांना संसदेत शोधत होतो. ते मला उत्तर प्रदेशात दिसले. परदेशात दिसले. पुतीन यांना मिठी मारताना दिसले. पण पंतप्रधान येत नाहीत, असा टोला राऊत यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.

Leave a Comment