कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
सातारा तालुक्यातील अंबेवाडी येथे कराड उत्तरचे भाजपा नेते मनोज घोरपडे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले. यावेळी सरपंच अनिल शितोळे, उपसरपंच शंकर जाधव, अशोकराव घाडगे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी गावातील अंतर्गत कॉक्रीट रस्ता व साठवण बंधारा याचे लोकर्पण करण्यात आले. यावेळी मनोज घोरपडे म्हणाले, आजपर्यंत माझ्या राजकीय व वैयक्तिक जीवनात आंबेवाडी गावचे योगदान मोठे आहे. मीही माझे स्वतःचे गाव असल्यासारखे आहे. आजपर्यत जसा गावचा सर्वांगीन विकास केला तसा येथून पुढे गावच्या विकासासाठी कायम सहकार्य राहील. गावातील सर्वांनी मतभेद विसरून गावच्या विकासासाठी एकत्र यावे.
यावेळी सौ. वैशाली शितोळे, उद्धव मोहिते, सौ. सुनिता बोडके, बाळासो शितोळे, संजय शितोळे, हणमंत शितोळे, केशव शितोळे, सुनिल शितोळे, शिवाजी शितोळे, अधिक शितोळे, प्रकाश शितोळे, सुधाकर शितोळे, कालीदास ढाणे, विकास बर्गे, दत्ता शितोळे, संदीप बर्गे, युवराज शितोळे, मदन शितोळे , बबन पवार, तात्यासो शितोळे, दिपक शितोळे, दिलीप खरात, लक्ष्मण शितोळे, विजय तुपे अदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक नितीन शितोळे यांनी तर सुत्रसंचालन प्रदिप शितोळे यांनी केले.