सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात सॅनिटरी पॅड व्हेंडींग मशिनचे उद्घाटन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीमध्ये महिलांच्या आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने सॅनिटरी पॅड व्हेंडींग मशिन व पॅड नाश करणाऱ्या मशीन बसविण्यात आले आहे. या मशिनचे सातारा जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला ज. धोटे यांच्या हस्ते औपचारीकरित्या उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक वर्षा जोशी, न्यायालय व्यवस्थापक रविंद्र काळे, अधिक्षक धनंजय वनारसे, सुजाता घोडके, संगिता गुरव, चंद्रकांत कांबिरे व महिला कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी महिलांनी आरोग्यविषयक बाब लक्षात घेवून आणि स्वच्छतेच्या दृष्टीने सदर मशिनचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन श्रीमती धोटे यांनी उपस्थित महिलांना केले. शासनाच्या नाविन्यपुर्ण योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी, सातारा यांनी उपलब्ध करुन दिलेल्या निधीमधुन या मशिन्स बसविण्यात आल्या आहेत.

पॅड व्हेंडींग मशिन प्राथमिक स्तरावर न्यायालयातील महिला कर्मचारी व महिला विधीज्ञ यांचेसाठी उपलब्ध केलेले आहे. लवकरच ही मशिन महिला पक्षकारांसाठी उपलब्ध करणार असल्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती धोटे यांनी सांगितले.