मोदींच्या ‘मन की बात’ चे 100 Episodes पूर्ण; बिल गेट्स यांनी केले अभिनंदन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा 100 वा भाग संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयातून प्रसारित केला जाणार आहे. रविवार, 30 एप्रिल रोजी मन कि बातचा 100 वा भाग प्रसारित होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

बिल गेट्स यांनी याबाबत ट्विट करत म्हंटल की, ‘मन की बात’ने स्वच्छता, आरोग्य, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि शाश्वत विकास उद्दिष्टांशी संबंधित इतर मुद्द्यांवर समुदायाच्या नेतृत्वाखालील कृती उत्प्रेरित केली आहे. 100 व्या एपिसोड बद्दल नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन …..

दरम्यान, 3 ऑक्टोबर 2014 रोजी पहिल्यांदा मोदींनी मन की बातच्या माध्यमांतून जनतेशी संवाद साधला होता. 30 एप्रिल 2023 रोजी मन की बातचे 100 एपिसोड पूर्ण होणार आहेत. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनवर मन की बात कार्यक्रम प्रसारित केला जातो. आता त्याचा ऐतिहासिक असा हा 100 वा भाग खाजगी FM स्टेशन, कम्युनिटी रेडिओ आणि विविध टीव्ही चॅनेलसह 1000 रेडिओ स्टेशनवर प्रसारित केला जाईल.