व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

सातारा- कास पठार ई- बसचे उद्घाटन

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
साताऱ्यातील जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पुष्प पठार पर्यटनासाठी खुल करण्यात आलं आहे. कासला फुलाचा हंगाम सुरू झाला असून या ठिकाणी पर्यटनासाठी ई-बसच्या उद्घाटन समारंभ आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले.

कास पठार पाहण्यासाठी पर्यटकांना या बसमधून गणेश खिंड येथून नेण्यात येणार आहे. यासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येणार आहे. साताऱ्यात 2 बस उपलब्ध करण्यात आल्या असून अजून 3 बस उपलब्ध करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले आहे.

सदरील कार्यक्रम नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे ऑनलाईन पध्दतीने पार पडला. यावेळी सातारा- जावली मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, वन अधिकारी उपस्थित होते.