खंडपीठाच्या आवारात 88 कोंटीतून बांधलेल्या अद्ययावत इमारतीचे उद्या उद्घाटन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आवारात 88 कोटी रुपयांतून बांधण्यात आलेल्या ‘बी’ आणि ‘सी’ विंगच्या इमारतीचे उद्या 23 ऑक्टोबर रोजी सर न्यायाधीश एन. व्ही. रमण, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पाहणी करून आढावा घेतला आहे.

खंडपीठाचा आवारात 88 कोटींतुन ही इमारत उभारली असून ‘ए’ विंगच्या इमारतीचे काम अपूर्ण आहे. ते मार्च 2022 पर्यंत पूर्ण होईल. मुख्य इमारतीच्या पाठीमागील बाजूला बांधलेल्या या अद्ययावत इमारतीमध्ये न्याय व प्रशासनाच्या अनुषंगाने दालनांची व्यवस्था करण्यात आली आहे. तळमजल्यावर वकिलांसाठी कार्यालय असतील. पहिल्या मजल्यावर 6 कोर्ट हॉल आणि 12 न्यायमूर्तींची दालने तर दुसर्‍या मजल्यावर 6 कोर्ट हॉल आणि 12 न्यायमूर्तींची दालने आहेत एकूण 12 कोर्ट हॉल 24 न्यायमूर्ती दालान असलेल्या इमारतीचे उद्घाटन उद्या होत आहे.

या इमारतीसाठी 88 कोटींचा सुधारित खर्चाचा प्रस्ताव असून यामध्ये 20 कोटींचा खर्च इलेक्ट्रिक कामांवर झाला आहे. इमारतींच्या एकूण तीन विंग्स आहेत. त्यातील दोन विंग्सचे काम पूर्ण झाले असून, ‘ए’ विंगचे काम अद्याप बाकी आहे.

Leave a Comment