हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण दररोज आपल्या आहारामध्ये साखरेचा वापर करत असतो. अगदी चहा पिण्यासाठी किंवा वेगवेगळे गोड पदार्थ आपण खातो. त्यामध्ये साखरेचा वापर केलेला असतो. ही साखर आपल्याला खायला जरी चांगली वाटत असली, तरी देखील या साखरेमुळे आपल्या आरोग्याला खूप मोठे नुकसान होत असते. मधुमेह असेल किंवा वजन वाढण्याची समस्या असेल या सगळ्या गोष्टी साखरेच्या सेवनामुळे होत असतात. तुम्ही जर प्रमाणापेक्षा जास्त साखर खाल्ली तर त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. आता साखर आरोग्यासाठी हानिकारक आहे, म्हणून आपण गोड खाणे तर सोडू शकत नाही. अशावेळी आपण साखरे ऐवजी असे काही पदार्थ खाल्ले पाहिजे. ज्यामुळे आपल्याला गोड खाण्याचा अनुभव देखील मिळेल आणि आपल्या शरीराला कोणते नुकसान देखील होणार नाही. आज आपण असे काही पाच पदार्थ पाहणार आहोत. जे तुम्ही साखरेऐवजी वापरू शकता आणि ते तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतील.
1) गूळ
आजही अनेक लोक जेवण बनवताना गुळाला प्राधान्य देतात. गुळामध्ये मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सीडेंट असतात. ज्यामुळे तुमच्या आरोग्याला फायदा होतो. आणि चव देखील चांगली लागते. त्याचप्रमाणे अनेक रसायनांपासून तुमची सुटका होते. चहा आणि इतर ड्रिंक्समध्ये जर तुम्ही साखरेऐवजी गुळाचा वापर केला, तर तुम्हाला त्याचे चांगले फायदे मिळतील.
2) खजूर साखर
आपल्या नॉर्मल साखरेच्या तुलनेत खजुराच्या साखरेमध्ये जास्त पोषक घटक असतात. तुम्ही या साखरेचे सेवन करून चांगले फायदे मिळू शकतात. खजूर हा एक पौष्टिक पदार्थ आहे. ज्यामध्ये नैसर्गिकरित्या साखर असते. त्याचप्रमाणे खजूरमध्ये असलेले फायबर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते. म्हणूनच तुम्ही चांगल्या आरोग्यासाठी खजूर साखर देखील वापरू शकता.
3) नारळ साखर
नारळ साखर हा एक तुमच्यासाठी खूप चांगला पर्याय आहे. तुम्ही चहा आणि कॉफीमध्ये साखर टाकता. त्या ऐवजी जर तुम्ही नारळ साखर टाकली, तर त्याचे तुम्हाला खूप चांगले फायदे मिळतील. नारळात अनेक पोषक तत्वे असतात. त्याचप्रमाणे फायबर देखील असते. यामुळे तुमच्या आतड्यांचे आरोग्य देखील चांगले राहील.
4) स्टीव्हिया
स्थिती हा चांगल्या साखरेसाठी एक चांगला पर्याय आहे. स्टीव्हिया हा वनस्पतींच्या पानापासून तयार केलेली असते. ही साखर आपल्या नॉर्मल साखरेच्या पटीने कितीतरी गोड असते. परंतु या साखरेमध्ये कॅलरीज, कर्बोदके आणि कृत्रिम घटक आढळत नाही. याचा तुमच्या शरीराला चांगला फायदा होऊ शकतो.