Protein Day 2023 : आहारात ‘या’ 5 प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा अन् फिट रहा

Protein Day 2023
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज 27 फेब्रुवारी… जगभरात आजचा दिवस प्रोटीन डे म्हणून साजरा केला होता. निरोगी शरीरासाठी आणि स्नायू मजबूत करण्यासाठी प्रोटीनची आवश्यकता असते. प्रत्येकाला त्याच्या वजनाच्या प्रति किलो 0.8 ग्रॅम प्रथिने आवश्यक असतात. आज आंतरराष्ट्रीय प्रथिने दिवस असून आजच्या दिवशी प्रथिनांची जागरूकता, गरज आणि आरोग्यासाठी प्रथिनांचे सेवन कसे करावे यावर चर्चा केली जाते. तसेच, सर्व वयोगटातील लोकांच्या आरोग्यासाठी प्रथिनांचे महत्त्व पटवून दिले जाते. आज आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ बाबत सांगणार आहोत जे प्रोटीनचे मुख्य स्रोत म्हणून ओळखले जातात.

1) अंडी-

संडे हो या मंडे रोज खावो अंडे.. अंडी हा प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो. अंड्यामध्ये व्हिटॅमिन डी, बी-12 आणि इतर अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात. अंडी खाल्ल्याने शरीरात स्नायू तयार होतात आणि शरीर मजबुत होते. तुम्ही सुद्धा तुमच्या रोजच्या आहारात किमान दोन अंड्याचा समावेश करावा.

2) पनीर –

जे लोक मांसाहार करत नाहीत अशा लोकांसाठी पनीर प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. पनीरमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि इतर पोषक तत्वे आढळतात. 100 ग्रॅम पनीरमधून शरीराला जवळपास 18 ग्रॅम प्रोटीन मिळतात. त्यामुळे तुम्ही रोजच्या आहारात पनीरचा समावेश अवश्य करा.

3) सोयाबीन-

पोषक तत्वांनी समृद्ध असलेले सोयाबीन शाकाहारी लोकांसाठी प्रोटीन म्हणून चांगलंच ओळखले जाते. सोयाबीन मध्ये अमिनो अॅसिड आढळतात जे शरीराला उच्च प्रथिने तसेच जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि निरोगी चरबी प्रदान करतात. 100 ग्रॅम सोया चंक्समध्ये 52 ग्रॅम प्रथिने असतात.

4) चिकन – मटण

चिकन आणि मटण म्हंटल की आपल्या तोंडाला लगेच पाणी सुटत. चिकनला प्रोटीनचा सर्वोत्तम सोर्स म्हंटल जाते. 100 ग्रॅम चिकन मध्ये 27 ग्रॅम प्रोटीन असते. याशिवाय यामध्ये विटामिन बी, कॅल्शियम याचाही समावेश होतो. ग्रील्ड चिकन खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात.

5) मासे –

माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन ई आणि प्रथिने चांगल्या प्रमाणात असतात. 100 ग्रॅम माशांमध्ये 20 ग्रॅम प्रोटीन असते. अनेक बॉडी बिल्डर आपल्या आहारात आठवड्यातून 2 वेळा तरी मासे खातात. मेंदूला चालना देण्यासाठी आणि डोळ्याच्या आरोग्यासाठी सुद्धा मासे उपयुक्त असतात.